Sunday, January 2, 2011

जिजाऊ-सावित्री व्याख्यानमाला 2010 Nilanga

महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करू नका - बनबरे



निलंगा, ८ जानेवारी/वार्ताहर
लोककल्याणकारी व समतेचे राज्य निर्माण करण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, बसवेश्वर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांनी मानवाच्या मुक्तीसाठी लढा दिला आहे. त्यामुळे संकुचित विचाराच्या मानसिकतेतून महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करू नका, असे आवाहन लेखक गंगाधर बनबरे यांनी केले.
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद यांनीफार्मसी महाविद्यालयात जिजाऊ-सावित्री व्याख्यानमाला आयोजित केली आहे. त्यात श्री. बनबेरे बोलत होते. व्याख्यानमालेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष पंडितराव धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. एल. एरंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून लिंबराज सूर्यवंशी, श्रीमती वनीता काळे उपस्थित होत्या.
श्री. बनबरे म्हणाले की, महापुरुषांच्या विचारामुळे अनेक राष्ट्रे विकसित झाली; परंतु ज्यांच्या शरीरात महापुरुषांचे रक्त आहे, तो भारतीय शेतकरी आत्महत्या करत आहे ही बाब खेदजनक आहे. बहुजन समाजातील भावनिक संघर्षांचे मूळ अज्ञानात आहे त्यामुळे ताकद असूनही मस्तक नसल्याने बहुजन गलितगात्र झाला आहे. बहुजनांची विद्येची देवता सरस्वती नसून सावित्री आहे. कारण फुले दांपत्यामुळेच बहुजन समाज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आला आहे. मराठा बहुजन समाजाला खरा शत्रू कोण, हे न समजल्याने तो आपसातच संघर्ष करीत आहे. आगामी लढाई ढाल, तलवारीची नसून बुद्धीची आहे हे ओळखून शिक्षणाची कास धरावी, असेही ते म्हणाले.
श्री. धुमाळ, प्राचार्य एरंडे यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक एम. एम. जाधव यांनी, सूत्रसंचालन प्रा. हंसराज भोसले यांनी केले. दिलीप धुमाळ यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment