Sunday, January 2, 2011

सांगलीत ३ जानेवारीपासून सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव

सांगलीत ३ जानेवारीपासून सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव



सांगली, २९ डिसेंबर / प्रतिनिधी
मराठा सेवा संघप्रणीत जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त दि. ३ ते १२ जानेवारी या कालावधीत सलग दहा दिवस सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती आशा पाटील यांनी दिली.
सोमवार, दि. ३ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता माजी राज्यमंत्री अजित घोरपडे यांच्याहस्ते या सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. त्याचदिवशी श्रीमती स्वाती शिंदे-पवार ‘२१ व्या शतकातील महिला’, दि. ४ जानेवारी रोजी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॉ. कैलास पाटील ‘महिलांचे उद्योग व मार्गदर्शन’, तर दि. ५ जानेवारी रोजी गौतम पाटील ‘महाराष्ट्रीय लोककला’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दि. ६ जानेवारी रोजी महिलांसाठी वक्तृत्व स्पर्धा, तर दि. ७ जानेवारी रोजी आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन सोनिया मदन पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या आरोग्य शिबिरात दात, हाडांचा ठिसूळपणा व हिमोग्लोबीन तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे.
शनिवार, दि. ८ जानेवारी रोजी १० ते १४ या वयोगटातील विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत. दि. ९ जानेवारी रोजी मराठा समाजातील मुला-मुलींसाठी वधू-वर मेळावा होणार आहे. दि. १० जानेवारी रोजी अ‍ॅड. शोभा चव्हाण ‘कायदा’ या विषयावर मार्गदर्शन करणार असून दि. ११ जानेवारी रोजी ‘स्वसंरक्षण’ या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी वक्तृत्व स्पर्धा होतील. बुधवार, दि. १२ जानेवारी रोजी ऐश्वर्या प्रतीक पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण कार्यक्रम होणार असल्याचेही श्रीमती आशा पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment