सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव

Savitri Jijau Dashratrotsav From 3rd January To 12Th January

Showing posts with label khamgaon. Show all posts
Showing posts with label khamgaon. Show all posts

Sunday, January 2, 2011

खामगावात सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव

Posted by aditya at 8:58 PM No comments:
Labels: khamgaon, savitri jijau dashrateotsav
Older Posts Home
Subscribe to: Posts (Atom)

Savitriaai Janmotsav 3rd January

खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे 'सावित्रीबाई फुले यांचा १८०वी जयंती सोहळा' व 'भारतीय स्त्री मुक्ती दिन' समारंभ सोमवार, ३ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता होत आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार असल्याची माहिती नायगावचे सरपंच राजेंद नेवासे यांनी दिली.

सावित्रीबाई फुले यांचे नायगाव हे जन्मगाव असून, दरवर्षी येथे हा सोहळा आयोजित केला जातो.

Savitri Jijau Abhiwadan

Savitri Jijau Abhiwadan

'राजमाता जिजाऊ' साहेबांची अभिमानदर्शी चरित कहाणी. मराठी पडद्यावर प्रथमच.

मराठी चित्रपटांत सध्या वेगवेगळे विषय सक्षमपणे हाताळले जात आहेत. पण सध्याच्या या वाटचालीत ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करणे हे एक धाडसच आहे. आणि हे धाडस आहे नगर जिल्ह्यातील सौ. मंदाताई शरदराव निमसे, आपल्या जिजाई चित्र, शिर्डी या चित्रपट निर्मिती संस्थेचे. या संस्थेअंतर्गत 'राजमता जिजाऊ' या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक यशवं भालकर, निर्मात्या सौ. मंदाताई निमसे, शरदराव निमसे आणि चित्रपटात जिजाऊंची भूमिका साकारणार्‍या प्रा. डॉ. स्मिता देशमुख यांनी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची भेट घेतली. निर्मितीसंस्थेतर्फे त्यांना राजमाता जिजाऊंचे स्मृतीचिन्ह दिले. साहसी आणि दैदिप्यमान चरित्रशिल्प घडविणार्‍या जिजाऊंवर चित्रपटनिर्मिती करण्याच्या धाडसाचे कौतुक राष्ट्रपतींनी केले. कथानकाविषयी जाणून घेऊन शिवाजीच्या व्यक्तीरेखेसंदर्भात विचारणा केली व सर्वांना शुभेच्छा दिल्या.

गेली १५ वर्षांपासून बुलढाण्याच्या प्रा. डॉ. स्मिता देशमुख या 'मी जिजाऊ बोलतेय...' या एकपात्री नाटकाचा प्रयोग करत आहेत. फेब्रुवारी अखेरीस चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून पहिले सत्र फलटनच्या वाडयात तर दुसरे भोरच्या वाडयात होईल. बाबासाहेब सौदागर यांनी लिहिलेल्या, शशांक पोवर यांनी संगीतबद्ध केलेली कैलाश खेर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातली गाणी रेकॉर्ड झाली आहेत. मदन पाटील यांच्या जिजाऊ साहेब कादंबरीवर आधारीत या चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांनी लिहीले आहेत. चित्रपटासाठी नितीन देसाई यांनी कला दिग्दर्शन केले आहे. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी राहूल खंडारे यांच्याकडे असून प्रसिद्धीची सूत्रे भूपेंद्रकुमार नंदन करत आहेत.

रमाबाईंच्या जीवनावरील चित्रपट प्रदर्शित

रमाबाईंच्या जीवनावरील चित्रपट प्रदर्शित




भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई यांच्या जीवनावरील मराठी चित्रपटाचे येथील समर्थ चित्रपटगृहात समारंभपूर्वक प्रदर्शन सुरू करण्यात आले. साईनाथ चित्र निर्मित या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक प्रकाश जाधव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका करणारे अभिनेते गणेश जेठे, रमाबाईंच्या छोटय़ा बहिणीची भूमिका करणारी सायली विलनकर व मीराची भूमिका करणाऱ्या स्नेहल विलनकर, छायाचित्रकार त्रिलोकी चौधरी यांच्या उपस्थितीत येथील निवासी उपजिल्हाधिकारी सोनप्पा यमगर यांनी दीपप्रज्वलन व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून चित्रपटाच्या प्रदर्शनाचा शुभारंभ केला. या वेळी क्रांती थिएटरचे संस्थापक नगरसेवक अमर गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्य सचिव तहसीलदार विकास खरात आदी मान्यवर उपस्थित होते.निवासी उपजिल्हाधिकारी सोनप्पा यमगर या प्रसंगी म्हणाले, युगपुरुषाची पत्नी रमाबाई आंबेडकर यांनी प्रचंड त्यागपूर्ण जीवन जगून बाबासाहेबांचे उत्तुंग जीवन घडविण्यास परिश्रमपूर्वक मदत केली व अशा रमाबाई घराघरात आजही आहेत. परंतु बाबासाहेबांसारखा महापुरुष एकमेव आहे. रमाबाईंच्या जीवनावरील चित्रपट अनेक आंबेडकर निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. अशोक गायकवाड यांनीही रमाबाईंच्या त्यागाच्या पाठिंब्यावरच बाबासाहेबांचे मोठेपण उभारले असल्याचे सांगितले. ‘रमाई’ चित्रपटाचे निर्माते प्रकाश जाधव यांनी सांगितले की, आपण अनेक मराठी चित्रपटांचे संकलन केल्यानंतर प्रथमच या चित्रपटाच्या निर्मिती-दिग्दर्शनाच्या क्षेत्राकडे वळलो आहे. मराठवाडय़ात २६ डिसेंबरपासून हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याठिकाणी त्यास लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. थोर पुरुषांच्या पाठीमागे रमाबाईंसारख्या स्त्रिया खंबीरपणे उभ्या राहिल्यानेच इतिहास घडलेला आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हा चित्रपट पाहिला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका करणारे गणेश जेठे यांनी सांगितले, की आपण रंगभूमीवर अनेक नाटकांतून कामे केली. टीव्ही सीरियलमधील कामानंतर प्रथमच मराठी चित्रपटात काम करण्याची संधी एक आव्हान म्हणून स्वीकारली व ती यशस्वीपणे पार पाडली आहे. बाबासाहेब म्हणून लोकांकडून आता आपले स्वागत होत आहे. ही समाधानाची बाब आहे. डॉ. जब्बार पटेल यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील चित्रपट गाजला आहे. परंतु तो मुद्दाम पाहिला नाही. त्यामुळे त्या चित्रपटातील मामुटीने वठवलेल्या भूमिकेचे सावट मी माझ्या भूमिकेवर पडू दिलेले नाही, असे गणेश जेठे यांनी सांगितले. रमाबाईंची प्रधान भूमिका निशा परुळेकर यांनी केली आहे. देव चौहाण यांचे संगीत, डी. बी. सकपाळ व नितीन नीलेश यांची गीते, निर्माते प्रकाश जाधव यांची पटकथा व पाश्र्वगायन शकुंतला जाधव, नंदेश उमप, विजय सरतापे यांचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक, सामाजिक, राजकीय कारकीर्द व शैक्षणिक उंची गाठण्याच्या कालावधीत रमाबाईंनी कायम एकाकीपणे कुटुंबाचा गाडा सांभाळून, आयुष्यभर हालअपेष्टा सोसून त्याग केला. त्याचे दर्शन या चित्रपटाद्वारे प्रथमच समाजासमोर येत असल्याचे प्रकाश जाधव यांनी सांगितले.

Followers

free counters

About Me

aditya
View my complete profile

Blog Archive

  • ▼  2011 (4)
    • ▼  January (4)
      • आज क्रांतीज्योती सावित्रीआई जयंती,विनम्र अभिवादन..
      • खामगावात सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव
      • सांगलीत ३ जानेवारीपासून सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव
      • जिजाऊ-सावित्री व्याख्यानमाला 2010 Nilanga
  • ►  2009 (1)
    • ►  January (1)
Ethereal theme. Powered by Blogger.